भोरटेकजवळ एसटी बसच्या अपघातात शाळकरी मुलगा गंभीर जखमी.!!!

0 427

भोरटेकजवळ एसटी बसच्या अपघातात शाळकरी मुलगा गंभीर जखमी.!!!

भडगाव ता प्रतिनिधी: अमीन पिंजारी,

भडगाव तालुक्यातील भोरटेक गावाजवळ मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. तांदूळवाळी येथून शाळा सुटल्यावर सायकलवरून घरी परतत असलेला कुणाल किशोर कोळी (वय 14, रा. भोरटेक) या शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिली.

चाळीसगावहून सायगावच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MH 3791) ने कुणाल याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमी विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे हलवले.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित एसटी बस थांबवून तपासासाठी भडगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!