निलेश मालपूरे यांची भडगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे माजी संचालक निलेश दत्तात्रय मालपूरे यांची नुकतीच धुळे येथील राष्ट्रस्तरीय अधिवेशनात भडगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रदेश कार्यवाह यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष सुनिलजी नेरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते आणि निलेशजींचा यथोचित सत्कार करण्यात आला.
निलेश मालपूरे हे मानवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून त्यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे नियुक्तीच्या निमित्ताने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.