वरसाडे प्र.पा. येथे देशी दारूचा साठा जप्त — पिंपळगाव पोलिसांची मोठी कारवाई.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने वरसाडे प्र.पा. गावात मोठी कारवाई करत सुमारे ₹३७,४०० किमतीचा देशी दारू साठा जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरसाडे प्र.पा. येथील सुभाष गना राठोड हा आपल्या राहत्या घरी देशी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे उघड झाले.
त्यानंतर सपोनि वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका तात्याबा नागरे, पोना रविंद्रसिंग पाटील, पोकॉ गोविंद वाळले, पोहेका अरुण राजपूत, पोना राहुल बेहरे, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ सागर पाटील, तसेच महिला पोलीस शिपाई योगिता चौधरी यांच्या पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.
या कारवाईत संशयित सुभाष राठोड यांच्या घरातून टॅगो पंच या ब्रँडच्या सुमारे ९ खोके (प्रत्येकी १०० बाटल्या, प्रत्येक बाटली ९० मि.ली.) व खुल्या ३५ बाटल्या असा एकूण ₹३७,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी सुभाष राठोड याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, पोकॉ गोविंद वाळले यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८३/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका तात्याबा नागरे हे सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.