राष्ट्रीयशैक्षणिक

समाधान मैराळे यांना मानद डॉक्टरेड पदवी प्रदान.!!!

समाधान मैराळे यांना मानद डॉक्टरेड पदवी प्रदान.!!!

अमळनेर प्रतिनिधी:

येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात मॅजिक अ‍ॅण्ड आर्ट विद्यापीठ, हरियाणा यांच्यावतीने मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण्यात आली.

या विद्यापीठाकडून मागील महिन्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींकरिता मानद डॉक्टरेडसाठी अर्ज मागवण्यात आले होते. पात्रतेच्या आधारे संपूर्ण देशातून काही निवडक व्यक्तींची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून फक्त दोन व्यक्तींना ही नामांकन मिळाले असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे समाधान मैराळे यांचा समावेश होता.

दिनांक १४ जून रोजी, दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातील सुमारे ३८ मान्यवरांना मानद डॉक्टरेड पदवीने सन्मानित करण्यात आले. ही गौरवमय पदवी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील डॉ. राम अवतार शर्मा आणि दिल्ली पोलिसातील अधिकारी किरण सेठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

समाधान मैराळे यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारिता आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही पावती समजली जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!