अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘आज माझा शाळेचा पहिला दिवस’ या उत्साहवर्धक संकल्पनेसह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली होती. विद्यार्थ्यांना नवे गणवेश, पाठ्यपुस्तके आणि सुंदर पुष्पगुच्छ देण्यात आले. विशेषतः ‘आज माझा शाळेचा पहिला दिवस’ अशा मजकुराची फोटो फ्रेम विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षण ठरली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिर्झा नाजीम,आणि कार्यकर्माचे अध्यक्ष मिर्झा सरवर बेग होते तसेच संस्थेचे अध्यक्ष.आसिम मिर्झा,सचिव, शेर खान, संचालक सरवर बेग मिर्झा,यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अनेक पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. शाळेच्या वतीने औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही दिले गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. रहीम बागवान, अशपाक कुरेशी, दानिश आलम, अब्दुल कादिर खान, शेख अझरुद्दीन, अश्फाक पिंजारी तसेच शिक्षिका शगुफ्ता खान, शगुफ्ता शेख आणि कर्मचारी मुक्तार मिर्झा, इसाक मलिक, नदीम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. बालकांच्या किलबिलाटाने शाळा परिसर आनंदमय झाला होता.