भडगावात विवाहितेवर अमानुष हल्ला; आरोपी पतीस कठोर शिक्षा द्यावी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी.!!!
भडगावात विवाहितेवर अमानुष हल्ला ; आरोपी पतीस कठोर शिक्षा द्यावी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी.!!!
भडगाव (प्रतिनिधी):
भडगाव शहरातील पेठ भागात राहणारी तृप्ती रेवण पवार हिच्यावर तिचाच पती रेवण प्रमोद पवार याने अमानुषपणे मारहाण करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराने संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तृप्ती हिला घरात येताच आरोपी पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर चारचाकी वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तृप्ती गंभीर जखमी झाली असून, तिला वाचविण्यास धावून आलेल्या तिच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी रेवण प्रमोद पवार यास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पी.एस.आय. गणेश मस्के यांनी दिली.
या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली सुयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना सादर करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका योजना पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, माजी उपसभापती राजेंद्र पाटील, शहरप्रमुख मनिषा पाटील, तालुकाप्रमुख चेतन पाटील, युवाधिकारी भैय्या राजपूत, युवासेना प्रमुख रोनित अहिरे, समन्वयक भूषण देवरे, पंडित पाटील, उपप्रमुख सत्यजित पाटील, मनोज पाटील, रमेश पाटील, प्रियदर्शिनी पाटील, स्मिता बोरसे, पौर्णिमा पाटील, दत्तात्रय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याआधीही भडगावातीलच शारदा बागुल हिच्यावर पतीकडून झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पोलिस व न्यायप्रणालीने वेळेवर आणि कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका नागरिकांतून मांडली जात आहे.