समाधान मैराळे यांना मानद डॉक्टरेड पदवी प्रदान.!!!
अमळनेर प्रतिनिधी:
येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात मॅजिक अॅण्ड आर्ट विद्यापीठ, हरियाणा यांच्यावतीने मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण्यात आली.
या विद्यापीठाकडून मागील महिन्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींकरिता मानद डॉक्टरेडसाठी अर्ज मागवण्यात आले होते. पात्रतेच्या आधारे संपूर्ण देशातून काही निवडक व्यक्तींची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून फक्त दोन व्यक्तींना ही नामांकन मिळाले असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे समाधान मैराळे यांचा समावेश होता.
दिनांक १४ जून रोजी, दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातील सुमारे ३८ मान्यवरांना मानद डॉक्टरेड पदवीने सन्मानित करण्यात आले. ही गौरवमय पदवी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील डॉ. राम अवतार शर्मा आणि दिल्ली पोलिसातील अधिकारी किरण सेठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
समाधान मैराळे यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारिता आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही पावती समजली जात आहे.