झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला.!!!

रात्री झोपेत असताना साप चावला

0 73

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला.!!!

रात्री झोपेत असताना साप चावला

बीड प्रतिनिधी :-

बीड जिल्ह्यातील काजळीगावा मध्ये घडलेली एक हृदयद्रावक घटना

संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्यामुळे झोपेतच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

ही घटना इतकी अचानक आणि धक्कादायक होती की, संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

झोपेतील चिमुकल्यांवर काळाचा घाला गावातील रहिवासी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील १० आणि ८ वर्षांच्या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी झोपेतून उठण्याचं नाव न घेतल्याने पालकांनी पाहणी केली, तेव्हा दोघांच्याही शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळले. तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गाव हादरून गेला आहे. संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून, मृत बालकांच्या पालकांची अवस्था पाहून डोळे पाणावत होते. दोन निष्पाप जीव एका क्षणात काळाच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गावात हंबरडा फुटला होता. या घटनेने गावात सर्पदंशाविषयीची भीती अधिक तीव्र केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ निरीक्षण आणि जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!