उंदीरखेड्याचे सुपुत्राला कर्तव्यावर बालाघाट येथे वीरमरण.!!!

0 94

उंदीरखेड्याचे सुपुत्राला कर्तव्यावर बालाघाट येथे वीरमरण.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – भारत भूमीचे सुपुत्र उंदिरखेडे ता.पारोळा येथील रहिवासी जवान भगवान यादव नेतकर (५७) यांना बालाघाट (छत्तीसगढ) येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले.

जवान भगवान नेतकर हे एप्रिल १९८७ मध्ये सीआरपीएफचा कॉन्स्टेबल पदावर भरती झाले.सध्या ते थ्री स्टार वरीष्ठ अधिकारी म्हणून सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स तुकडी १२३ चा बालाघाट येथे सेवा बजावत

होते.आज गुरुवारी सकाळी तीन वाजता कर्तव्यावर त्यांना वीरमरण आले.उपनिरीक्षका सह २३ पोलीस कर्मचारी जवान हे त्यांचे पार्थिव शासकीय वाहनाने उंदीरखेडे येथे आणणार असल्याची माहिती प्राप्त आहे.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता गावातील दलित स्मशानभूमी नाथनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांनी जवळपास ३८ वर्ष प्रदीर्घ देशसेवा बजावली.तीन वर्षानंतर ते सेवानिवृत्त होणार होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!