वसुधैव कुटुंबकम्” : कुटुंबमूल्यांचा सन्मान करणारा साहित्यिक सोहळा

0 103

वसुधैव कुटुंबकम्” : कुटुंबमूल्यांचा सन्मान करणारा साहित्यिक सोहळा

पिंपरी, पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : कर्मयोगिनी महिला संस्था – पिंपरी चिंचवड आणि आर्य समाज मंदिर – पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कुटुंब दिनानिमित्त एक प्रेरणादायी व बहुआयामी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमात मा. राज अहेरराव (ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते, अध्यक्ष – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ) यांचे “वसुधैव कुटुंबकम्” या विषयावर अभ्यासपूर्ण व उद्बोधक व्याख्यान होणार आहे. त्यानंतर मा. सुनिती लिमये (ज्येष्ठ गझलकार) यांच्या अध्यक्षतेखाली “घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती” या भावस्पर्शी विषयावर काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मा. पुरुषोत्तम सदाफुले (ज्येष्ठ साहित्यिक, कार्याध्यक्ष – म.सा.प., भोसरी), मा. मीनाताई पोखरणा (ज्येष्ठ समाजसेविका), मा. उत्तम दंडिमे (कवी, व्याख्याते, उपाध्यक्ष – आर्य समाज, पिंपरी) आणि मा. दिनेश यादव (ग्रंथपाल – आर्य समाज, पिंपरी) यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

 

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे कवयित्री केशर विजय भुजबळ यांच्या “शब्दकस्तुरी मनातली” या काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा. रसिकांसाठी हा एक संस्मरणीय आणि साहित्यप्रेम जागवणारा क्षण ठरणार आहे.

 

कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत सीमा शिरीष गांधी (कर्मयोगिनी महिला संस्था व कार्यकारी मंडळ). तर कार्यक्रमाचे ठिकाण आहे आर्य समाज मंदिर, पिंपरी, पुणे आणि वेळ आहे शनिवार, १७ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे.

 

साहित्य, संस्कृती आणि कुटुंबमूल्यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून सर्व रसिकांना करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!