माझं शरीर, माझी मर्जी.नवऱ्याने बायकोच्या रोमान्सबद्दल सांगितली धक्कादायक माहिती, ‘त्या’ चॅटमुळे घडलं.?
माझं शरीर, माझी मर्जी.नवऱ्याने बायकोच्या रोमान्सबद्दल सांगितली धक्कादायक माहिती, ‘त्या’ चॅटमुळे घडलं.?
उत्तर प्रदेश :-
Viral News : उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये,एक खळबळजनक घटना घडली आहे.
एका तरुणाने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तरुणाने त्याच्या व्यथा सांगत हत्या होण्याची भीती व्यक्ती केली.
तरुणाने विनंती करत म्हटलंय की, त्याला आणि त्याच्या मुलाला वाचवावं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण.?
हे धक्कादायक प्रकरण झांसीच्या मऊरानीपूर येथील आहे. इथे राहणारा पवन नावाचा तरुण महोबा आरोग्य विभागात नोकरी करतो. त्याला सहा वर्षांचा एक मुलगा आहे. पवनची पत्नी सरकारी शाळेत क्लर्क आहे. पवनने त्याच्या पत्नीच्या चारित्र्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. पत्नी अेक व्यक्तींसोबत बोलते, असा आरोप त्याने लावला आहे. यामुळे ते वेगळे राहतात.
पवनने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याला धमकी देते. पत्नीच्या धमक्यांमुळे जीवन असह्य झालं असून मुलाच्या हत्येची भीतीही त्याला सतावत आहे. एक दिवस माझं आणि मुलाचा मृतदेह एखाद्या ड्रममध्ये मिळेल, अशी भीती पवनने व्यक्त केली आहे. मला आणि माझ्या मुलाला वाचवा, असं आवाहन पवनने लोकांना केलं आहे.
पवनने सांगितली धक्कादायक माहिती
पवनने म्हटलं, ” मी राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी रुग्णालयात काम करतो. मी मागील वर्षी ऑक्टोबरच्या 10 तारखेला माझ्या पत्नीला एका व्यक्तीसोबत चॅट करताना पकडलं होतं. तिचं चॅट पाहून तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता. मी समज दिल्यानंतर तिने म्हटलं होतं की, माझं शरीर, माझी मर्जी, मी काहीही करेन. तू कोण आहेस, मला रोखणारा? तेव्हापासून मी आणि माझी पत्नी वेगळे राहत आहोत.
काल रात्री मी माझ्या मुलाला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवर मुलगा रडत होता. माझ्या पत्नीने मुलाचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला. पण फोन फिरवल्यानंतर मला भास झाला की, दुसरा व्यक्ती माझ्या पत्नीच्या बाजूला आहे. त्यानंतर माझ्या पत्नीने फोन कट केला. त्यानंतर मी 112 नंबरवर कॉल केला. त्यानंतर पत्नीसोबत चॅट करणाऱ्या अभिषेकला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं”.