लग्नानंतर हनीमूनच्या रात्री पत्नीला समजलं की.?विषय थेट पोलीस ठाण्यात.!!!
मध्यप्रदेश :-
हनीमून पती-पत्नीसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हनीमूनच्यावेळी पती-पत्नी मोकळेपणाने आपल्या भावना, विचार परस्परांजवळ व्यक्त करतात. पण हनीमूनच्यावेळी समजलं की, तुमचा जोडीदार नपुंसक आहे तर?.
असच एक प्रकरण मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये समोर आलय. लग्नानंतर हनीमूनच्या रात्री पत्नीला समजलं की, नवरा नपुंसक आहे. यावरुन घरात इतका तणाव निर्माण झाला की, विषय पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचला. पत्नीचा आरोप आहे की, नवऱ्याच्या या स्थितीबद्दल सासरकडच्यांना विचारलं, तर त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरु केली.
हा त्रास सहन करण्यापलीकडे गेला, त्यावेळी तीन महिन्यानंतर नव्या नवरीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांना सर्वकाही सांगितलं. सासरकडच्या मंडळींविरोधात फसवणूक, मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवली. विवाहितेच्या रिपोर्ट्वरुन तिचा नवरा, पती, सासू-सासरे आणि चुलत सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कोणाला ही गोष्ट सांगू नको’
महिलेने पोलिसांना सांगितलं की, डिसेंबर 2024 मध्ये तिचं लग्न झालेलं. आई-वडिलांनी सोनं-चांदी, दागिने, कपडे आणि अन्य सामान दिलं होतं. विवाहाच्या 15 दिवसानंतर तिला समजलं की, नवऱ्याच्या नपुंसकतेवर उपचार सुरु आहेत. नवऱ्याला या बद्दल विचारल्यानंतर त्याने सांगितलं की, उपचार सुरु आहेत. कोणाला ही गोष्ट सांगू नको. तेव्हापासून दोघांमध्ये वादावादी सुरु होती.
भावाच्या कानाखाली मारली
लग्नाच्या तीन महिन्यानंतर ती माहेरी आली. त्यावेळी तिने घरच्यांना हे सर्व सांगितलं. विवाहितेने सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी माझे आई-वडिल व भाऊ माझ्या सासरी गेले होते. माझे वडिल माझ्या नवऱ्याबरोबर बोलले, त्यावेळी पती, सासू-सासरे आणि चुलत सासऱ्यांनी माझ्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली. नवऱ्याच्या काकांनी माझ्या भावाच्या कानाखाली मारली. हुंड्यात तुम्ही लोकांनी काय दिलय? 25 लाख रुपये घेऊन या, नाहीतर तुमच्या बहिणीला नांदवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर हा सर्व विषय पोलिसात पोहोचला.