भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून एका २६ वर्षीय तरुणाची हत्या.!!!

0 574

भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून एका २६ वर्षीय तरुणाची हत्या.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्का बुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. व हातात लाकडी दांडके घेऊन त्याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याला जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी १० वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी बाप व भावा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी-

सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील,रा.बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!