‘माझी कन्या’ ला ७५ लाखांचा धनलाभ; ३०० मुलींच्या नावे होणार फिस डिपॉजिट.!!!
शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री या बंद पडलेल्या योजनेतील रखडलेला निधी सोमवारी प्राप्त झाला. महिला व बालकल्याण विभागाला ७५ लाख रुपये प्राप्तझाले असून या योजनेतील पात्र ३०० मुलींच्या खात्यात सदरची रक्कम प्रत्येकी २५ हजार ते ५० हजारा या प्रमाणात फिक्स डिपॉजिट केली जाणार आहे.
शासनाने २०१७ मध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत एका मुलीला ५० हजार तर दोन मुली असल्यास प्रत्येकी २५ हजारांचे अनुदान सदर मुलीच्या खात्यात फिक्स डिपॉजिट केले जात होते. परंतु २०२३ मध्ये या योजनेत बदल करीत लेक लाडकी योजना सुरू केली आहे. यामध्ये मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला विविधटण्यातनिधी दिल्या जातो. ही योजना सुरू केल्यानंतर मात्र मागील माझी कन्याचे पैसे शासनाकडे थकलेहोते. आतापर्यंत या योजनेत २ कोटी ३२ लाखांचा निधी प्राप्त झाला होता.
तर या योजनेतील लाभार्थी अद्यापही वंचित असताना अखेर सोमवारी ३१ मार्च रोजी शासनाकडून महिला व बालविकास विभागाला ७५ लाखांचा निधी मिळाला आहे. यामधुन जिल्ह्यात सुमारे ३०० मुलींच्या खात्यात सदरचा निधी फिक्स डिपॉझिट केल्या जाणार आहे. मार्च एण्डिगला लक्ष्मींना धनलाभ मिळाल्याने जिल्ह्यात पालकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.