नाशिकचे तापमान 39 वर; तर मालेगाव ने ओलांडली 40 शी.!!!
नाशिक, 30 मार्च नाशिकच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तापमान 39 अंश डिग्री सेल्सिअस च्या पुढे गेल्यामुळे नाशिककरांना चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी उष्णतेचा मारा सहन करावा लागला आहे.
मालेगाव चे तापमान हे चाळिशी ओलांडल्यामुळे या ठिकाणी उष्णतेचा मारा सहन करावा लागला.
नाशिक जिल्ह्यातील तापमानाने मागील महिन्यात चढ-उतार केला होता सातत्याने तीन दिवस 36 डिग्री अंश सेल्सिअस तापमान राहिल्यानंतर तापमान वातावरणातील विविध बदलांमुळे तापमान हे 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत आले होते परंतु फाल्गुन महिना सपता सपता तापमान मध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आणि मागील तीन दिवसापासून तापमान सातत्याने एक दोन अंश डिग्री सेल्सिअसने वाढू लागले. एकूण महिना संपल्यानंतर आज रविवारी चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानामध्ये जवळपास अडीच अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे रविवारी सायंकाळी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नाशिकचे तापमान 39.2 अंश डिग्री सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आलेली आहे तर नाशिकचे तापमान वाढले असतानाच मालेगाव मध्ये देखील तापमानाने 40 पार केले असून 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान नोंद करण्यात आलेले आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात झालेल्या वाढीमुळे येणाऱ्या काळात अजून उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागेल.