चॅट जीपीटी वापरून फ्रि घिबली स्टाईल AI व्हिडिओ आणि फोटो कसा तयार करायचा? सर्व डिटेल्स घ्या जाणून.!!!
चॅट जीपीटी वापरून फ्रि घिबली स्टाईल AI व्हिडिओ आणि फोटो कसा तयार करायचा? सर्व डिटेल्स घ्या जाणून.!!!
AI-जनरेटेड कलेचा सोशल मीडियावर मोठा प्रसार झाला असून जगात आता घिबली स्टाईल इमेज आणि व्हिडिओचे वेड लागले आहे.ही स्टाईल प्रत्येक युजर्स डोक्यावर घेताना दिसत आहे.
जो तो आपापले छायाचित्र घिबली स्टाईल करु पाहत आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे स्टारकास्ट, पत्रकार आणि असंख्य युजर्सची घिबली स्टाईल इमेज आता सोशल मीडियावर दिसत आहेत.
एआय जनरेडेट या कलेने सोशल मीडियावर कब्जा केला आहे. जो तो या एनिमेडेट फोटो आणि व्हिडिओचा आपल्या सार्वजनिक जीवनात सहज आणि जलदरित्या वापर करताना आता दिसत आहे. हयाओ मियाजाकी यांच्या प्रतिष्ठित चित्रपटाची आठवण आता होत आहे. हाताने निर्माण केले जाणारे चित्र आता तंत्रज्ञानाच्या जोरावर सहज तयार होत आहे. या तंत्रज्ञानाने घिबली स्टाईलला मोठी प्रसिद्धी आणि चांगले दिवस मिळाले आहे.
स्टेप्स 1: ChatGPT ची नवीनतम आवृत्ती उघडा, नंतर प्रॉम्प्ट बारवरील तीन-बिंदू चिन्हावर क्लिक करा.स्टेप्स 2: “इमेज” पर्याय निवडा, जो “कॅनव्हास” पर्यायाशेजारी दिसेल.
स्टेप्स 3: तुम्हाला परिणाम कसा हवा आहे हे तपशीलवार मजकूर प्रॉम्प्ट प्रदान करा, उदा. “गर्द झाडाखाली एखाद्या व्यक्तीचे स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट तयार करा”
स्टेप्स 4: एकदा प्रतिमा जनरेटन झाल्यानंतर, तुम्ही अधिक विशिष्ट तपशीलांसह सुधारणांची विनंती करून ती रिफाईंड करू शकता
स्टेप्स 5: प्रतिमेसह समाधानी झाल्यानंतर, ते डाउनलोड करा.ChatGPT व्यतिरिक्त, तुम्ही Grok, Microsoft Copilot आणि इतर पर्याय देखील वापरू शकता
Grok AI जनरेटरसह आश्चर्यकारक प्रतिमा कशी तयार करावी?
Grok 3 सह प्रतिमा तयार करणे खूप सोपे आहे आणि तुम्ही वेब आवृत्तीद्वारे किंवा थेट ॲपवर या वैशिष्ट्यात प्रवेश करू शकता. फक्त या सोप्या स्टेप्स वापरा.
स्टेप्स 1: Grok इमेज जनरेटरमध्ये मजकूर प्रॉम्प्ट प्रविष्ट करा आणि आपल्या इच्छित प्रतिमेचे वर्णन करा.
स्टेप्स 2: नंतर इमेजमधील तपशील बारीक करण्यासाठी ‘इमेज संपादित करा’ पर्याय निवडा.
स्टेप्स 3: परिणाम पहा आणि तुमचे आवडते डाउनलोड करा.
Microsoft Copilot सह प्रतिमा कशी तयार करावी
स्टेप्स 1: Copilot सह प्रतिमा निर्माण करण्यासाठी, Copilot चिन्हावर जा.
स्टेप्स 2: प्रतिमा निर्माण करण्यासाठी उपखंडात तुमचा प्रॉम्प्ट टाइप करा.
स्टेप्स 3: सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही तुमची AI इमेज प्रॉम्प्ट सुधारित आणि परिष्कृत करू शकता.स्टेप्स 4: प्रतिमा डाउनलोड करा