सिकंदर’च्या रिलीजपूर्वी सलमानने हात जोडत म्हटला ‘आम्हाला कोणताही वाद नको आहे’, आम्ही आधीच.!!!

0 221

सिकंदर’च्या रिलीजपूर्वी सलमानने हात जोडत म्हटला ‘आम्हाला कोणताही वाद नको आहे’, आम्ही आधीच.!!!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्यांच्या सिकंदर चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी म्हणजेच उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.

 

ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

दरम्यान सलमान खान सिंकदर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘सिकंदर’च्या प्रमोशनदरम्यान सलमानने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने त्याच्या फिटनेस आणि लूकबद्दलही भाष्य केलं आहे. काही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी वाद निर्माण होतात हे गेल्या काही काळापासून दिसून येत आहे. ज्याचा चित्रपटाला अनेक वेळा फायदा होतो. अशा परिस्थितीत सिकंदरच्या रिलीजपूर्वी झालेल्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सलमानने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल.

 

सलमान खानने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यात तो म्हणाला, “अरे भाई आम्हाला कोणताही वाद नको आहे , आम्ही आधीच खूप वादांमधून गेलो आहोत. आता आम्हाला कोणताही नवीन वाद नको आहे. वादामुळे चित्रपट हिट किंवा यशस्वी होतो असे मला वाटत नाही. आपण पाहिले आहे की, वादात सापडलेला चित्रपट जो शुक्रवारी प्रदर्शित होणार होता, तो पुढच्या मंगळवारी प्रदर्शित होतो. म्हणून कोणत्याही वादाची गरज नाही, अजूनही वेळ आहे, हे 2-3 दिवस जाऊ द्या. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, तोपर्यंत कोणत्याही वादाची गरज नाही. जरी हे खरं आहे की रिलीजपूर्वी वाद होतात.

 

आम्ही यापुर्वी एका चित्रपटाचे नाव ‘नवरात्री’असं ठेवले होते. त्यानंतर या नावाबद्दल मोठा वाद हा झाला होता, पण नंतर आम्ही ते ‘लवयात्री’ असे बदलले. आता वादाची गरज नाही, नाही, आम्हाला ते नको आहे. आमचे कुटुंब कोणत्याही वादविवादाविना दीर्घायुषी होवो. आपण खूप वाद पाहिले आहेत”, असं सलमान खानने बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान 28 मार्च रोजी सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटातील ‘हम आपके बिना’ हे नवीन गाणे काल रिलीज झालं आहे. या गाण्यात सलमान खान आणि रश्मिका मंदान्नाची सुंदर केमिस्ट्रीसह प्रेम आणि रोमान्सची झलक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट या रविवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ‘जोहरा जबीन’, ‘बम बम भोले’ आणि ‘सिकंदर नाचे’ नंतर, आता ‘हम आपके बिना’ हे सुंदर गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी छान दिसत आहे. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. त्याच वेळी गाण्याची मांडणी आणि सेटअप त्याला आणखी खास बनवत आहे, जे त्याच्या सुरांशी अगदी जुळता आहे.

 

प्रसिध्द गायक अरिजीत सिंगचा मधुर आवाज, प्रीतमचे हृदयस्पर्शी संगीत आणि समीरच्या सुंदर शब्दांने ‘हम आपके बिना’ हे गाणे प्रत्येक हृदयाला स्पर्श करणारे बनले आहे. हे गाणे प्रेम आणि भावनांनी भरलेले आहे, जे ‘सिकंदर’ चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. तर या रविवारी म्हणजेच उद्या मोठ्या पडद्यावर सलमान आणि रश्मिकाच्या जोडीची जादू पाहायला मिळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा