खेडीढोक येथे तरुणाच्या मृत्यू.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील खेडीढोक येथील ३८ वर्षीय तरुणास पायाला काही तरी चावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
खेडीढोक येथील रविंद्र यशवंत पाटील हे सकाळी आठ वाजता शौचास गेले असता तेथे त्यांना पायाला काहीतरी चावल्याने त्रास जाणवू लागला. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना सायंकाळीं सहा वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.प्रवीण पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली.त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास हवलदार कैलास साळुंखे करीत आहे.