पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेचा मुख्य टप्पा पारतामसवाडी धरण ते पारोळा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची नविन पाईपलाईनची चाचणी यशस्वी.!!!

0 37

पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेचा मुख्य टप्पा पार.तामसवाडी धरण ते पारोळा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची नविन पाईपलाईनची चाचणी यशस्वी.!!!

 

पारोळा प्रतिनिधी

 

पारोळा – माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या शहरातील अत्यंत ज्वलंत व जिव्हाळ्याचा पाणी पुरवठा योजनेचे काम हे सुरू आहे.गेल्या एक ते दिड वर्षापासुन सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.यातील तामसवाडी धरण ते पारोळा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत नविन पाईपलाईनचे काम आज पुर्णत्वास आले.या पाणी पुरवठा योजनेतील ही पाईपलाईन म्हणजे अत्यंत महत्वाचा टप्पा असुन आज या पाईपलाईनची चाचणी आमदार अमोल पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.कुठलाही अडथळा न येता सुरळीतपणे धरणातील पाणी हे जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत

पोहचले.या पाणी पुरवठा योजनेसाठी हे एक मोठे पाऊल आहे.त्यामुळे पारोळा शहरवासियांची पाण्यासाठी होणारी वणवण काही दिवसांत थांबणार आहे.ही शहरवासीयांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण,शेतकी संघाचे माजी संचालक दासभाऊ पाटील,नगर अभियंता सुमित पाटील,पाणीपुरवठा अभियंता संकेत कार्ले,दीपक महाजन, सार्थक मोरासकर,संजय गीते यांचेसह प्रगती कन्स्ट्रक्शनचे रंजन महाजन,यश कन्सल्टन्सीचे तुषार शिंपी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा