मनमाडमधील प्रेमीयुगलाच्या आत्महत्येआधीचा मित्राचा कॉल रेकॉर्ड व्हायरल.!!!
मनमाड :-
दोन दिवसांपूर्वी मनमाड नजीक असलेल्या वंजारवाडी येथील उज्वला खताळ व ज्ञानेश्वर पवार या दोन्ही प्रेमीयुगल जोडप्याने नांदगाव नजीक असलेल्या श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वे खाली आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिठीत गावातील अनेकांची नावे होती मात्र आत्महत्या झाल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या मात्र आता या प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका मित्राला कॉल केला होता या कॉलची रेकॉर्डिंग सध्या सर्वत्र व्हायरल झाली असुन यात स्पष्टपणे आम्हाला कोणी कोणी त्रास दिला आणि आम्हाला न्याय द्या आमची रेकॉर्डिंग आमच्या घरच्या पर्यंत व पोलिसांपर्यंत पोहचवा, अशी आर्त हाक या प्रेमी युगलाने आपल्या मित्राकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मनमाड शहराच्या नजीक वंजारवाडी येथील उज्वला खताळ व ज्ञानेश्वर पवार या दोन्ही प्रेमीयुगल जोडप्याने नांदगाव नजीक असलेल्या श्री श्रीक्षेत्र नस्तानपूर येथे रेल्वे खाली आत्महत्या केली मात्र या आत्महत्ये नंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले या महिलेने तर चक्क आमदार साहेब तुमच्या बहिणीला न्याय द्या अशी आर्त हाक देखील केली आहे मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या दोन्ही प्रेमीयुगलाने त्यांच्या एका मित्राला कॉल केला होता यामध्ये त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्रास दिला या सर्वांची नावे घेत आपल्या मित्राला हा कॉल रेकॉर्ड कर आणि आमच्या घरच्यांना व पोलिसांना देऊन आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न कर अशी आर्त हाक दिली आहे मुळात ज्यांची ज्यांची नावे त्या सुसाईट नोट मध्ये होती त्या सर्वांवर नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रेमीयुगल जोडप्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.