महाराष्ट्रमान्सूनविशेष

एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान.बघा हवामातज्ञ काय म्हणतात.?

एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान.बघा हवामातज्ञ काय म्हणतात.?

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ

१- संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली असून महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर जळगांव नाशिक या शहर व जिल्हा परिसरात थंडीची लाट व थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवू लागली आहे.

सदर परिस्थिती बुधवार ५ ते शनिवार ८ मार्च असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते.

२- कश्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.?

काल बुधवार ५ मार्चपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ होतांना दिसत आहे.

 

गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते काल बुधवार पर्यंत बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतून बदलातून जाणवत आहे.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!