आमदार तांबे पती – पत्नी ची मतदारसंघाच्या विकासासाठी घोडदौड
भडगाव प्रतिनिधी :-
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांना त्याच्या पत्नी खांद्याला खांदा लावून देत आहे साथ डॉ मैथिली तांबे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध शैक्षणिक संस्था ,
त्यांचे प्रमुख ,शिक्षक तथा जयहिंद लोकचळवळ चे प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडे भेटी दिल्या. मतदार संघातील पदवीधरांना येत असलेल्या समस्या जाणून घेण्याचे काम त्यांनी केले. जयहिंद लोकचळवळ च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी घेतली.
यावेळी आशुतोष पाटील (समन्वयक जयहिंद लोकचळवळ, भडगाव) दर्शन शिंपी, रोहीत देशमुख, आदी. चळवळीतील कार्यकर्ते व पदवीधर उपस्थित होते..