धक्कादायक. दहावीतील विद्यार्थिनीची प्रसूती, बोर्डाच्या परीक्षेचा पेपर संपताच दिला मुलाला जन्म
मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याचा पालकांचा आरोप
धक्कादायक. दहावीतील विद्यार्थिनीची प्रसूती, बोर्डाच्या परीक्षेचा पेपर संपताच दिला मुलाला जन्म
मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याचा पालकांचा आरोप
भुवनेश्वर- ओडिशातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वसतिगृहात शिकणारी दहावीची विद्यार्थिनी आई बनल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनी अनेक महिने गरोदर होती, तर शाळा व्यवस्थापनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असा प्रश्न मुलीचे वडीलही विचारत आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकाने संबंधित विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा भागातील एका सरकारी निवासी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला. ही शाळा राज्याच्या एससी/एसटी विभागामार्फत चालवली जाते. परीक्षा आटोपून परतल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. विशेष म्हणजे अनेक महिने गरोदर राहिल्यानंतरही ती वर्ग आणि परीक्षांना हजर होती. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा मी शाळेत पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
माझी मुलगी हॉस्टेलमध्ये राहते आणि बराच वेळ घरी येत नाही. एक परिचारिका वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करते. गर्भवती होण्याची चिन्हे कोणाच्या नजरेतून कशी चुकू शकतात? शाळेतील शिक्षकांनी या घटनेसाठी वसतिगृहाच्या वॉर्डनला जबाबदार धरले आहे. आदिवासी वसतिगृहांमध्ये किशोरवयीन गरोदरपणाच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने ३००० मेट्रन आणि ३३६ सहाय्यक तैनात केले आहेत. याशिवाय नियमित तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर महिला जोडीदाराशिवाय कोणत्याही पुरुषाला वसतिगृहात प्रवेश करता येणार नाही, असे नियमही कडक करण्यात आले आहेत. वसतिगृहात स्वयंपाकी, सुरक्षारक्षक आणि सहाय्यक म्हणून महिलांची नेमणूक करण्यात आली आहे.