देशमुख महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात तरूणाईचा जल्लोष.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी दोन दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार व विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये गायन, नृत्य, नाटिका, रांगोळी, मेंदी, केशरचना, पाककला, क्रिकेट आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी ‘टी-शर्ट डे’ व विद्यार्थिनींसाठी ‘साडी डे’ चे विशेष आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद लुटला. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ हे होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून खानदेशातील सुप्रसिद्ध कथाकार व म्हसदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे होते. संमेलनाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, सौ. सु. गि. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरुण पाटील, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. एस. डी. भैसे, संमेलन प्रमुख प्रा. शिवाजी पाटील, कोतकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. बी. एस भालेराव व प्रा. जी. डी. चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.