वाडे येथील देवराज पाटील यांची आंध्रप्रदेश राज्यात अतिरीक्त. पोलीस अधिक्षक म्हणुन निवड.!!!

0 790

वाडे येथील देवराज पाटील यांची आंध्रप्रदेश राज्यात अतिरीक्त .पोलीस अधिक्षक म्हणुन निवड.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व हल्ली मुक्काम धुळे येथील कलाशिक्षक मनिष शशिकांत पाटील यांचे सुपुञ देवराज ज्योती मनिष पाटील आय पी एस अधिकारी यांची आंध्रप्रदेश राज्यात काकीनाडा जिल्हयात नुकतीच अतिरीक्त पोलीस अधिक्षक म्हणुन निवड करण्यात आली आहे. त्यांनी अतिरीक्त पोलीस अधिक्षक पदाची सुञे हाती घेतलेली आहेत. यावेळी काकीनाडा येथील कार्यालयात अतिरीक्त पोलीस अधिक्षक देवराज पाटील यांचा आय पी एस अधिकारी पाटील यांनी पुष्पगुच्छ देउन सत्कार केला. त्यांनी पहीले वर्ष ट्रेनिंगचे मसुरी जम्मु काश्मिरला केले.

 

तर २ रे ट्रेनिंग हैद्राबादला झाली. हे ट्रेनिंग ३ महीन्यांसाठी होते. देवराज पाटील यांनी युपीएससी उत्तीर्ण करुन ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत. त्यांची आता आंध्रप्रदेश राज्यात काकीनाडा जिल्हयात अतिरीक्त पोलीस अधिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे या नियुक्तीबद्दल वाडे गावासह भडगाव तालुक्यातील नागरीकातुन कौतुक केले जात आहे.

 

ते भडगाव तालुक्यातील वाडे येथील सेवानिवृत्त कृषि अधिकारी कै. शशिकांत सहादु पाटील व सुधाकर सहादु पाटील, तसेच सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष सहादु पाटील यांचा नातु आहे.तर कै. दामु राघो शिंदे कुसुंबा यांचेही ते नातु आहेत. मनात जिद्द अन चिकाटी असली तर यशोशिखर गाठता येते. मनात असलेले स्वप्न पुर्ण करता येतात. हे देवराज पाटील यांनी सुरुवातीपासुन कोणतेच स्पर्धा परीक्षेचे क्लास न लावता आणि घरात चार भिंतींच्या आड राञंदिवस अभ्यास केला. आणि मला मोठा अधिकारी व्हायचे आहे. हे खर्या अर्थाने स्वप्न पुर्ण केल्याचा आनंद त्यांनी दै. लोकमतशी बोलतांना व्यक्त केला आहे. त्यांची प्रेरणा विदयार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. अशा या अतिरीक्त पोलीस अधिक्षक देवराज पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल जळगाव, धुळे जिल्हयातुन नातेवाईक मंडळी, मिञ मंडळी, नागरीकातुन अभिनंदन होतांना दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा