अन्यआपला जिल्हा

मुलाचा अचानक मृत्यू; काळजाच्या तुकड्याचा निष्प्राण देह पाहून आईने जागीच सोडला जीव.!!!

मुलाचा अचानक मृत्यू; काळजाच्या तुकड्याचा निष्प्राण देह पाहून आईने जागीच सोडला जीव.!!!

नाशिक प्रतिनिधी :-

शहरातील नामदेव शिंपी समाजातील मुकुंद पांडुरंग सदावर्ते (वय ६०) यांचे गुरुवारी (दि. ६) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांची आई, रुक्मिणी सदावर्ते (वय ८५), या पुत्रवियोग सहन करू शकल्या नाहीत आणि धक्क्याने त्यांचेही काही वेळातच निधन झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे माय-लेकाच्या अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्या. दोघांना शेवटचा निरोप देताना कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हळहळला.

मुकुंद सदावर्ते यांची प्रकृती काही काळापासून ठीक नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळी ७:३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही जगाचा निरोप घेतला.

नाशिकमध्ये यापूर्वीही माय-लेकाचा एकाच दिवशी मृत्यू

अशीच एक हृदयद्रावक घटना यापूर्वीही नाशिकमध्ये घडली होती. मनमाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय साकूबाई झाल्टे यांचा मुलगा मुकेश हा जन्मताच मनोरुग्ण होता. त्याला बोलता येत नव्हते, त्यामुळे त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आईच्या आधारावर अवलंबून होता.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अचानक मुकेशचा मृत्यू झाला. ही दुःखद बातमी त्याच्या मोठ्या भावाने आईला सांगितली, पण ती आपल्या मुलाच्या निधनाचा आघात सहन करू शकली नाही. अवघ्या काही तासांतच त्यांनीही प्राण सोडले. आयुष्यभर मुलाला एकटे सोडले नाही, तसेच शेवटच्या प्रवासालाही त्याला एकटे जाऊ दिले नाही.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!