खान्देश पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय जीवनगौरव व खान्देश भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.!!!

खान्देश पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय जीवनगौरव व खान्देश भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.!!!
भडगाव :- (जावेद शेख)
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित, सत्यनिष्ठा, निर्भयता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या ज्येष्ठ व कार्यरत पत्रकारांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी खान्देश पत्रकार संघ, अभिनव खान्देश यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव व खान्देश भूषण पुरस्कार – २०२६ जाहीर करण्यात आले आहेत.
६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या दर्पण दिन (राष्ट्रीय पत्रकार दिन) निमित्त या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांचा वितरण सोहळा संविधान बांधिलकी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
पत्रकारितेच्या सामाजिक सामर्थ्याचे प्रतीक ठरणाऱ्या
“खिचो ना कमानों को, न तलवार निकालो।
जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो॥”
या प्रेरणादायी विचारांच्या आधारे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मा. भा. ई. नगराळे (IAS – निवृत्त), सेवानिवृत्त सचिव, आदिवासी कल्याण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यायमूर्ती बापूसाहेब जे. टी. देसले, अध्यक्ष – शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, धुळे भूषविणार आहेत.
यावेळी मा. नानासाहेब सुभाषजी अहिरे (ज्येष्ठ साहित्यिक), बापूसाहेब ठाकूर (ज्येष्ठ पत्रकार), मा. अनिल चव्हाण (संचालक – झेप मीडिया), मा. निखिल सूर्यवंशी (दै. सकाळ, धुळे), मा. राजेंद्र शर्मा (दै. लोकमत, धुळे), मा. अविनाश पाटील (राज्य समन्वयक – व्यसनमुक्त महाराष्ट्र विचारमंच), मा. गो. पि. लांडगे (ज्येष्ठ पत्रकार – ‘एकला चालो रे’) तसेच मा. ललित चव्हाण (संचालक – धुळे टीव्ही) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जीवनगौरव व खान्देश भूषण पुरस्कारार्थी
यंदाचे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार पुढील मान्यवर पत्रकारांना प्रदान करण्यात येणार आहेत —
भाऊसाहेब अरुण पाटील – संपादक, दै. तोप, धुळे
मा. गंगाधर दिगंबर सोनवणे – ज्येष्ठ संपादक, मा. विश्वकर्मा प्रसाद, मालेगाव
तसेच खान्देश भूषण पुरस्कार खालील पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे —
प्रा. नेत्रदीपक कुवर – अध्यक्ष, शहादा तालुका पत्रकार संघ
श्री. भालचंद्र पाटील – संपादक, सुजाण नागरिक, धुळे
प्रा. रविंद्र निंबा पाटील – संपादक, साप्ताहिक रक्तबंधू
श्री. भगवान जगताप – संपादक, क्रांतीसत्ता
मा. ईश्वर महाजन – पत्रकार, अमळनेर
श्री. योगेश हिरे – लोकमत साथी
श्री. धनराज भिकन पाटील – प्रेस फोटोग्राफर, दै. सकाळ, भडगाव
श्री. विनोद पाटील – प्रतिनिधी, दै. लोकमत, सटाणा
प्रा. दीपक देशमुख – प्रतिनिधी, दै. सकाळ, झोडगे
श्री. रविंद्र खैरनार – प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, साक्री
खान्देश पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष विलासराव देसले, उपाध्यक्ष महेंद्रभाऊ येवले, धुळे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, समाजातील अन्याय, शोषण व भ्रष्टाचाराविरोधात निर्भयपणे लेखणी चालविणाऱ्या पत्रकारांचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव होत असल्याचे सांगितले.
हा पुरस्कार वितरण सोहळा.शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता,स्व. शिंपी सभागृह, गरुड वाचनालयाच्या वर, जेल रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आले होते
या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासचिव प्रेमकुमार अहिरे, ज्येष्ठ संचालक रमेश आप्पा बोरसे, सचिव ज्ञानेश्वर माळी व संस्थापक संचालक प्राचार्य बी. बी. महाजन यांनी केले आहे.



