कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पुलाचे काम पुर्ण करावे.भडगाव शेतकरी संघटनेचे सा. बां. विभागाला निवेदन.!!!

0 37

कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पुलाचे काम पुर्ण करावे.भडगाव शेतकरी संघटनेचे सा. बां. विभागाला निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम वेळेवर पुर्ण करण्याबाबत महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका मार्फत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव मतदार संघाचे आमदार अमोल पाटील, पाचोरा, भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, गणेश पाटील उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव, शितल सोलाट तहसिलदार भडगाव आदिंना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि, कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम अपुर्ण अवस्थेत आहे. व हे काम सध्या बंद आहे. या पुलाचे काम अपुर्ण असल्यामुळे पाटाला ३ ते ४ दिवस उशीराने पाणी सोडण्यात आलेले आहे. पाटाला पाणी उशीरा सोडल्याने शेतकर्यांचे पिकांच्या होणार्या नुकसानीस सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अधिकारी व पुलाचे काम करणारा संबंधीत ठेकेदार यास जबाबदार राहील. तसेच त्यांचेकडुन शेतकर्यांची झालेल्या नुकसानीची भरपाई घेतली जाईल.

तरी कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम लवकरात लवकर करुन शेतकर्यांचे हिताचा विचार करावा.असेही शेवटी या निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर महाराष्टृ शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, तालुका संपर्क प्रमुख भगवान चौधरी, खजिनदार मनोज परदेशी, उपाध्यक्ष शांताराम आचारी, कार्याध्यक्ष अनिल पाटील, अशोक भदाणे, कन्हैय्यालाल महाजन, सदस्य सुनिल पाटील, सुभाष ठाकरे, मनोज महाजन, लक्ष्मण पाटील, तालुका युवा अध्यक्ष उमेश धनगर, चेतन पवार, सल्लागार विजय पाटील आदि पदाधिकार्यांच्या सहया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा