जळगावशैक्षणिक

देशमुख महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

मूळजी जेठा महाविद्यालयाचा संघ ठरला जकातदार स्मृतिकरंडकाचा संयुक्त विजेता

देशमुख महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

मूळजी जेठा महाविद्यालयाचा संघ ठरला जकातदार स्मृतिकरंडकाचा संयुक्त विजेता

पाचोर्‍याची गायत्री क्षीरसागर प्रथम पारितोषिकाची मानकरी

 

भडगाव प्रतिनिधी:- जावेद शेख

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे “स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा -२०२६” उत्साहात संपन्न झाली. *जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाने हा करंडक पटकावला. प्रथम पारितोषिक पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री क्षीरसागर हिने प्राप्त केले. द्वितीय पारितोषिक अमोल पाटील (कबचौ उमवि, जळगाव), तृतीय पारितोषिक ऐश्वर्या पाटील (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), तर उत्तेजनार्थ पारितोषिके चेतन भदाणे (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) व प्रिया पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे) यांनी मिळविले.*

           तत्पूर्वी सुप्रसिद्ध समीक्षक-संपादक तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा. प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा प्रायोजक मा. बाबासो विनय जकातदार, ज्येष्ठ संचालक मा. दादासो खलील देशमुख, मा. दादासो डॉ. विजयकुमार देशमुख, मा. श्री. रमेशजी जकातदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील ३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी आपल्या प्रभावी मांडणी, ओजस्वी वाणी आणि सशक्त विचारांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि वैचारिक देवाणघेवाण घडावी हा अशा वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमागील प्रमुख उद्देश असतो, असे प्रतिपादन उद्घाटक मा. प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मा.बाबासो विनय जकातदार यांनी प्रायोजकांची भूमिका विशद केली. स्पर्धेचे समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. एस. सी. पाटील यांनी तर डॉ. दिनेश तांदळे यांनी आभारप्रदर्शन केले.

         पारितोषिक वितरण व समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब श्री. संजय ओंकार वाघ होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. नानासो श्री. व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. दादासो श्री. खलिल देशमुख, मा. बाबासो श्री. विनय जकातदार, मा.आप्पासो श्री. सतीश चौधरी, स्पर्धेचे परीक्षक मा. आबासो श्री. सुनील पाटील, मा. श्रीमती सुनंदाताई जकातदार, मा.डॉ. विजय पालवे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. 

       मा. नानासाहेब श्री. संजय वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थी जीवनातील वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व विशद केले. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक मा. दादासो खलिल देशमुख व परीक्षकांनीही स्पर्धेविषयी आपली मते मांडली. प्रास्ताविक स्पर्धेचे समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.सी. पाटील यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. डी.एम. मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विशेष उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!