वाडे विदयालयाच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा नागद येथे स्नेह मेळावा.
बालपणातील मिञांची.३३ वर्षांनी भरली पुन्हा शाळा.आठवणींना मिळाला उजाळा.!!!!
वाडे विदयालयाच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा नागद येथे स्नेह मेळावा.
बालपणातील मिञांची.३३ वर्षांनी भरली पुन्हा शाळा.आठवणींना मिळाला उजाळा.!!!!
भडगाव प्रतिनिधी :—
चाळीसगाव येथील रा.स. शि. प्र. मंडळ संचलीत वाडे येथील माध्यमिक विदयालयातील सन १९९२, १९९३ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता. हा स्नेह मेळावा नागद वडगाव जि. संभाजीनगर येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र येथे मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस. एस. पाटील हे होते. तब्बल ३३ वर्षांनी शाळेतील बालपणीच्या मिञ, मैञिणींची अनोखी शाळा आपल्या गुरुजनांच्या उपस्थित पुन्हा भरल्यामुळे माजी विदयार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलल्याचे दिसुन आले. भेट झाल्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांची कुतूहलाने विचारपूस करत हा मेळावा अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व मिञ, मैञिणींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना भगवे फेटे बांधण्यात आले. यावेळी गुरुजनांवर पुष्पवृष्टी करून सर्व गुरुजनांचे संगीताच्या तालावर पुष्पवृष्टी करून अनोखे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन एन. सी .माळी , पी. के .मोरे , डी .ए .मोरे, व्ही. पी .पाखले ,ए.सी.अहिरराव रमेश महाले, जिजाबाई महाले ,शिवाजी पाटील , अशोक परदेशी आदि गुरुजनवर्ग उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी ब्रीदवाक्य बनवले होते. एकच मनस्थिती शंभर टक्के उपस्थिती त्यानुसार शंभर टक्के उपस्थिती दर्शवुन सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह मेळाव्यासाठी सुरत ,पुणे ,नाशिक , छत्रपती संभाजीनगर असा दुरवर प्रवास करून हजर झाले. राम गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये वैभव महाजन, श्रावण कोळी , योगेश पाटील ,जालींदर चित्ते, रवी पाटील ,प्रवीण माळी , सुनील माळी , राजु परदेशी, राजेश वाघ,अर्जुन माळी, हिरामण पाटील, रवी मोरे, गोकुळ सोनवणे रत्ना चौधरी, सुरेखा माळी ,वर्षा परदेशी ,ज्योती पाटील ,मीनाक्षी माळी ,आशा माळी ,मनिषा पाटील ,राधा कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सकाळी ९ वाजेपासुन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मित्र मैत्रिणी हे जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये रंगुन गेले होते. शिक्षक व्हि. पी. पाखले, पि. के. मोरे व , रमेश महाले, जिजाबाई महाले, अशोक परदेशी यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच अध्यक्षिय भाषणातुन एस. एस. पाटील यांनी बालपणातील शाळेतील विदयार्थ्यांनी आज विविध क्षेञात चांगली प्रगती केली आहे. याचा आनंद आहे. असे विविध अनुभव मांडत एस. एस. पाटील यांनी हास्याचे फवारे उडवित जीवन जगतांना हसत हसत जीवन जगा असा संदेशही दिला. कार्यक्रमाचे काव्यमय रित्या सुत्रसंचालन सुधाकर पाटील यांनी केले. व आभार डॉ. सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. विदयार्थ्यांनी या निसर्गरम्य वातावरणात बोटींगमध्ये बसुन आनंद लुटला.