लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार.?

महत्त्वाची अपडेट आली समोर

0 37

लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार.?

महत्त्वाची अपडेट आली समोर

 

महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची कायम चर्चा होते. याच योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले, असेही बोलले जातेय. डिसेंबर महिन्यांपर्यंत या योजनेचा लाभ दोन कोटींहून अधिक महिलांनी घेतला.

आत्तापर्यंत सर्व हप्ते वेळेवर आले. मात्र आता जानेवारीचे १५ दिवस संपल्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी येणार, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

आत्तापर्यंत किती हप्ते आले.?

महायुती सरकारने जुलै २०२४ ला या योजनेची घोषणा केली होती. जुलैपासून डिसेंबर २०२४ पर्यंत प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. राज्यातील सुमारे सव्वा दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे. आता या महिन्यात म्हणजेच जानेवारीत येणारा हप्ता हा सातवा हप्ता असेल. मात्र अजून या हप्त्याबाबत माहिती समोर आलेली नाही.

कधी येणार जानेवारीचा हप्ता.?

जानेवारी महिन्यात येणारा सातवा हप्ता कदाचित २६ जानेवारीनंतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या महिल्या लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यांचे अर्ज तपासणी करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जानेवारीत काही महिला लाभार्थी कमी होतील, असेही सांगितले जात आहे. पात्र महिलांच्या खात्यात २६ जानेवारीनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असेही बोलले जात आहे.

२१०० रुपये कधी मिळणार.?

विधानसभेच्या घोषणापत्रात महायुती सरकारने महिलांना मिळणाऱ्या दीड हजारांचा हप्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर महिलांना २१०० रुपये कधी मिळणार या चर्चा सुरु झाल्या. मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना २१०० रुपये नक्की मिळतील, असे पुन्हा एकदा सांगितले होते. मात्र महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल, असेही सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा