महाराष्ट्रशैक्षणिक

अमळनेर तालुक्यातील जि.प. शाळा उदयनगरचा राज्यस्तरावर झेंडा

अमळनेर तालुक्यातील जि.प. शाळा उदयनगरचा राज्यस्तरावर झेंडा

अंमळनेर प्रतिनिधी :- राजेंद्र वाघ

The Bharat Scouts and Guides यांच्या राज्य कार्यालयातर्फे हस्ती भवन, दोंडाईचा येथे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिर उत्साहात पार पडले. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कब (मुले) व बुलबुल (मुली) पथकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. राज्यस्तरीय चतुर्थ चरण (कब) व हिरक पंख (बुलबुल) चाचणीसाठी एकूण १३७ विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये ७४ कब (मुले) व ६३ बुलबुल (मुली) यांचा समावेश होता.

 

अमळनेर तालुक्यातील जि.प. शाळा उदयनगर येथील सहा कब विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय शिबिरात उल्लेखनीय यश संपादन केले. तीन दिवसीय निवासी शिबिरादरम्यान लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा सर्वच टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळवून पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे कब विभागात जळगाव जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा म्हणून उदयनगर शाळेचा गौरव झाला.

 

यशस्वी विद्यार्थी

 

१) हेमराज हिरालाल पाटील

२) समर्थ काशिनाथ मोरे

३) जयेश समाधान पाटील

४) शिवराज योगेश पाटील

५) गणेश मंगेश भिल

६) समाधान रमेश पाटील

 

या विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक तथा कब मास्टर रविंद्र मासुळे यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जेष्ठ शिक्षक संजय पाटील यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. वेळप्रसंगी शाळा व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यही करून त्यांनी आदर्श शिक्षकत्वाचा प्रत्यय दिला.

 

नवीन रुजू झालेले शिक्षक नितीन शिंदे यांनी इंग्रजी विषयातील प्रभुत्व व संगणकीय कौशल्याच्या बळावर विद्यार्थ्यांना चित्रकला, वक्तृत्व आदी स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, धाडस व चिकाटी निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच उषा पाटील मॅडम यांनी गणित विषयात मूल्यमापनाधारित मार्गदर्शन, नियमित वाचन व स्वअभ्यासावर भर देत विद्यार्थ्यांची भक्कम पायाभरणी केली.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे गावकरी व पालकांनी तोंडभरून कौतुक केले असून मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. अमळनेर तालुक्यासाठी व जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!