जळगावमहाराष्ट्रसामाजिक

भडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने वेधले लक्ष.!!!

भडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने वेधले लक्ष.!!!भडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने वेधले लक्ष

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त पारंपरिक कुस्त्यांच्या भव्य आखाड्याचे आयोजन करण्यात आले. डफाच्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगलेल्या या कुस्त्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पहाटेपासूनच आखाडा परिसरात उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमास पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, प्रदीप मालचे, भडगाव नगरपरिषदेचे गटनेते लखीचंद पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, आसिम भाऊ मिर्झा, हाजी जाकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यासह परिसरातील नामांकित मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे मोठ्या संख्येने तरुण मल्लांसोबतच काही तरुणी मल्लांनीही आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. मातीच्या पारंपरिक आखाड्यात झालेल्या कुस्त्यांमध्ये ताकद, चपळाई आणि डावपेच यांचे सुंदर दर्शन घडले.

शहरातील मेन रोडलगत स्वामिल  परिसरात हा आखाडा पार पडला. कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी या स्पर्धांचा मनमुराद आनंद घेतला. काही चुरशीच्या कुस्त्यांमध्ये मल्लांनी एकमेकांना तगडी झुंज देत प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सोमेश्वर पंच मंडळी, ग्रामस्थ, युवक मंडळ आणि स्वयंसेवकांनी अनमोल परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन, मल्लांसाठी आवश्यक सुविधा व सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारा हा आखाडा भडगावच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरला.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!