जळगावराजकीयसामाजिक

नगरसेविका सीमा नरवाडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठांसाठी शासकीय योजनांचे शिबिर

नगरसेविका सीमा नरवाडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठांसाठी शासकीय योजनांचे शिबिर

भुसावळ  प्रतिनिधी :- अरुण तायडे 

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील गौतम नगर येथील बौद्ध विहारामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष माहिती व अर्ज भरणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेविका सीमा नरवाडे यांच्या संकल्पनेतून आणि तहसील कार्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रीती लुटे, नगरसेविका सीमा नरवाडे व प्रा. प्रशांत नरवाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

पदभार स्वीकारताच कामांना गती

नगरसेविका सीमा नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रभागातील मुलभूत समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. अनेक ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करून परिसर प्रकाशमय करण्यात आला. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने नियमित साफसफाईस प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवतानाच थेट शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले.

योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया समजावून सांगितली

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रीती लुटे उपस्थित होत्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व अर्ज भरण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या शंकांचे जागेवरच निरसन करण्यात आले.

मोठ्या संख्येने ज्येष्ठांचा सहभाग

शिबिरात प्रभागातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांसाठी अर्ज भरले. कार्यक्रमाला भाजप शहर सचिव वंदना सोनार, भाजप एससी सेल शहराध्यक्ष रविंद्र दाभाडे, अश्विन नरवाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र हिवराळे, पंडित दाभाडे यांच्यासह महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक नरवाडे व भाजप शहर सरचिटणीस जयंत माहुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत नरवाडे यांनी मानले. नगरसेविका सीमा नरवाडे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल प्रभागात समाधान व्यक्त होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!