भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
आगामी भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहिमेला आज आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली. सकाळी श्रीराम मंदिरात नारळ फोडून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यानंतर आजाद चौकातून प्रचार यात्रेला प्रारंभ झाला.शनी चौक,सय्यद वाळा, गंजीवाडा, जालाली वाडा, कोळीवाडा, काकासाठ चौक आदी भागांतून ही यात्रा उत्साहात पार पडली. स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत घोषणाबाजीने वातावरण दुमदुमवले.
या वेळी तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील, समाधान पाटील,भूरा आप्पा,डॉ. शेख, गणेश अण्णा परदेशी, लखीचंद पाटील, इमरान अली सैय्यद, अतुल पाटील, अतुल परदेशी,जहांगीर मालचे,सुनील देशमुख,आसिम भाऊ मिर्झा,शशी भाऊ येवले,ता.अध्यक्ष स्वप्निल पाटील,नाना चौधरी, बबलू देवरे,यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधत विकासाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या प्रसंगी आमदार पाटील म्हणाले, “नगरपरिषद निवडणुकीत विकास आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे प्रमुख मुद्दे असतील. नागरिकांचा पाठिंबा हाच आमचा बळ आहे,”असे त्यांनी सांगितले.
