गोंडगाव येथील माजी विदयार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात. ४० वर्षानंतर विदयार्थ्यांची भरली पुन्हा शाळा.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयातील सन १९८४, १९८५ या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकुण ४८ विदयार्थी, विदयार्थींनीचा सहकुटुंब सहभाग होता. बालवयातील शालेय शिक्षणाचे धडे गिरविलेले विदयार्थी तब्बल ४० वर्षानंतर आपल्या गोंडगाव येथील विदयालयात या कार्यक्रमानिमित्त एकञ आल्याचा आनंद दिसुन आला. जुन्या आठणींना या कार्यक्रमानिमित्त उजाळा मिळाला. विदयार्थ्यांची हजेरी घेतली जात होती. सेवानिवृत्त शिक्षक पी. एस. चव्हाण यांनी शाळेप्रमाणे यावेळीही वर्गात विदयार्थ्यांची हजेरी घेतली. शाळेच्या विदयार्थ्यांची जणु ४० वर्षानंतर पुन्हा शाळा भरल्याचे दिसुन आले. या कार्यक्रमानिमित्त माजी विदयार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा फेटा बांधुन शाल, श्रीफळ, गुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विदयार्थी, विदयार्थीनी, माजी शिक्षक, व उपस्थित कुटुंबातील सदस्यांना फेटे बांधल्याने कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरल्याचे दिसुन आले.तसेच स्नेह मेळाव्यानिमित्त बालपणीचे सर्व मिञ, मैञिणी एकञ आल्याने यावेळी ५ किलोचा मोठा केक विदयालयाचे मुख्याध्यापक तसेच माजी विदयार्थी बी. जी. नन्नावरे यांचेसह इतर सर्व माजी विदयार्थ्यांच्या हस्ते केक कापुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी शिक्षक पी. एस. चव्हाण, ए. बी. मोरे, व विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी.नन्नावरे, एस. एल. मोरे, ए. एम. परदेशी, व्हि. एम. जाधव आदि शिक्षकेतर कर्मचारी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षक पी. एस. चव्हाण हे होते. सुरुवातीस विदयालयाच्या आवारात प्रवेशद्धारातुन” गुरुजनांसह माजी विदयार्थ्यांचे आगमन होताच पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्टृगिताने करण्यात आली. सुरुवातीस सरस्वती, साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्ताविक मुख्याध्यापक बी.जी. नन्नावरे यांनी केले. सुञसंचलन मंजुषा मोराणकर व अर्चना पवार यांनी केले.यावेळी शरद पाटील, नेहरु पवार यांचेसह माजी विदयार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी मांडुन मनोगत व्यक्त केले.
तसेच ए. बी. मोरे, पी. एस. चव्हाण या माजी शिक्षकांनी आपल्या मनोगतातुन शालेय बालपणाचे विदयार्थी, विदयार्थीनींनी विविध क्षेञात प्रगती करुन आपले ध्येय साध्य केलेले आहे.तसेच आपल्या या बॅचचा माजी विदयार्थी याच विदयालयात मुख्याध्यापक पदि बी. जी. नन्नावरे हे आज मुख्याध्यापक म्हणुन चांगले कामकाज पाहत आहेत. आणि आज योगायोगाने हा कार्यक्रम याच विदयालयात पार पडत आहे अभिमानाची बाब असल्याचे सांगीतले. तसेच विदयार्थ्यांना या कार्यक्रमानिमित्त भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार मंजुळा देवरे यांनी मानले.कार्यक्रमानंतर मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेऊन आनंद घेण्यात आला.तसेच या बॅचच्या विदयार्थ्यांनी विदयालयासाठी साऊंड सिस्टीम भेट वस्तु म्हणुन दिली.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी ज्ञानेश्वर पवार, बी. जी. नन्नावरे, नेहरु पवार, प्रभाकर पाटील, रावसाहेब पाटील, मच्छिंद्र पाटील, दिनकर पाटील , सुरेश सुरंजे, मंजुळा देवरे आदि माजी विदयार्थ्यांनी नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी सर्व माजी विदयार्थी, विदयार्थीनींनी परीश्रम घेतले.
