अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.!!!

0 178

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करणाऱ्या तरुणाने तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

भडगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीशी स्थानिक तरुणाची ओळख काही महिन्यांपूर्वी झाली होती. सुरुवातीला त्या तरुणाने प्रेमसंबंधाचे आमिष दाखवत मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने मुलीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. मात्र मुलीने नकार दिल्यावर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले आणि “हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी दिली.

या घटनेने घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या कुटुंबियांनी तत्काळ भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरीत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.याबाबत दिनेश राजु माळी या संशयित आरोपी विरुद्ध पोस्को कायदा आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७६,७८,३५१(२), आदी कलमां नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याघटने बाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!