भडगाव ते वाडे बंद बसफेर्या सुरु कराव्यात.पञकार अशोक परदेशी यांचे भडगाव बसस्थानकाला निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
भडगाव ते वाडे काही बंद बस फेर्या सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. या मागणीचे निवेदन पञकार अशोक महादु परदेशी यांनी भडगाव बसस्थानक वाहतुक निरीक्षक आर. एस. चौधरी , पाचोरा आगाराला दि. २९ रोजी बुधवारी दिलेले आहे.
भडगाव बसस्थानकाला दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, भडगाव ते वाडे काही बस फेर्या सुरु आहेत. तर काही बसफेर्या जवळपास ९ ते १० दिवसापासुन भडगाव बसस्थानकामार्फत शाळांना सुटया असल्याने अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. पाचोरा आगारातुन वाडे बस फेर्या सोडल्या जातात. अनेकदा बस फेर्या बंद केल्याने प्रवाशांना भडगावी शासकीय वा इतर कामांसाठी आर्थिक भुर्दंड सहन करीत ञास सहन करावा लागतो. असेही निवेदनात म्हटले आहे.
भडगाव ते कोठली, वढधे,निंभोरा, लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब, वाडे, टेकवाडे बुद्रुक असे जवळपास १७ गावांचे प्रवाशी, विदयार्थी, भडगाव ते वाडे दरम्यान बसने प्रवास करतात. माञ भडगाव ते वाडे दरम्यान काही बस फेर्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होतांना दिसत आहेत. वृद्धमंडळींचे प्रवासात हाल होतांना दिसत आहेत. बस फेर्या बंद असल्याने एस. टी. महामंडळाचेही उत्पन्न बुडत आहे. तरी एस. टी. महामंडळाने तात्काळ दखल घ्यावी. भडगाव ते वाडे बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा प्रवाशांसह भडगाव बसस्थानकाजवळ उपोषण करण्यात येईल.याची एस. टी. महामंडळाने दखल घ्यावी. असेही शेवटी निवेदनात नमुद केलेले आहे. या निवेदनावर पञकार अशोक परदेशी यांची सही आहे.