फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी.!!!

0 32

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याची रहिवासी असलेली फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येस जबाबदार असलेले पो.नि.गोपाल बदने व प्रशांत बनकर यांचेवर कठोर कारवाई करून शिक्षा करावी.

सदर महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशीच दि.२३/१०/२०२५ रोजी आत्महत्या केली.तत्पूर्वी तिने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली आहे.त्यानुसार तिच्यावर चारवेळा अत्याचार झाले. मानसिक त्रास दिला गेला. तिचे वडील अत्यंत गरीब शेतकरी आहेत. या परिवाराचा आधार गेला. मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा. व परिवारास आर्थिक व मानसिक आधार द्यावा. सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जर नोकरी करणाऱ्या महिलाच सुरक्षित नसतील तर इतर महिलांचे काय ?

अशा घटना घडू नयेत यासाठी वेळीच पायबंद व्हावा. यासाठी पाठपुरावा करावा.अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. अशा शब्दात सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून शेतकरी संघ संचालिका मा. नगरसेविका योजनाताई पाटील,अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा पाटील,शिवप्रेरणा संस्थेच्या अध्यक्षा मिना बाग,सचिव मनिषा पाटील,सदस्या रेखा शिरसाठ आदी महिला पदाधिकारींनी तहसीलदार शितल सोलाट व पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!