श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना भडगाव तालुकाध्यक्षपदी पत्रकार सतीश पाटील यांची निवड
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील रहिवासी व भडगाव तालुका चॅनल रिपोर्टर पत्रकार सतीश युवराज पाटील यांची राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य संघटक नानासाहेब बच्छाव, उत्तर महाराष्ट्र संघटक समाधान बाविस्कर, जळगाव जिल्हा संघटक भिकनभाऊ सोनवणे, तसेच युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र वराडे यांनी सतीश पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
याशिवाय पत्रकार नातेवाईक, मित्रमंडळींसह भडगावचे ज्येष्ठ पत्रकार अशोकबापू परदेशी, तसेच वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचा सौ. ऊषाबाई परदेशी यांनीही त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.