अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी नियुक्ती.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी भडगाव येथील अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, प्रदेश महासचिव मा. प्रा. किसन चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रकान्वये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
अॅड. ब्राम्हणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व सामाजिक बांधिलकीमुळे पक्षसंघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीची बातमी समजताच भडगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी अॅड. ब्राम्हणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अॅड. ब्राम्हणे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वंचित, शोषित व पीडित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाज परिवर्तनाच्या चळवळीस बळकटी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाच्या धोरणांचा प्रसार गावोगावी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”