कृषीजळगाव

पिचर्डे येथे अवकाळी पावसाने काद्यांचे नुकसान.!!!

पिचर्डे येथे अवकाळी पावसाने काद्यांचे नुकसान.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे काल दि. १५ रोजी आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. यापूर्वी देखिल थोड़ा अवकाळी पाऊस आलेला होता.

पिचर्डे येथिल शेतकरी विश्वनाथ सुकदेव पाटील यांनी अडीच एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केलेली होती. कांदा पिक काढणीला आलेले असल्यामुळे काही कांदा काढलेला होता आणि काही जमिनीत होता. अवकाळी पाऊस जोरात आल्यामुळे कांदा पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकासाठी एक लाखाच्या वर खर्च झालेला आहे. कांदा रोप, लावणी, निंदणी, पावडर मारणे अशी मशागत धरून लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकावला गेला. खर्च केलेला पैसा देखिल निघणार नाही. निसर्गाची अशी अवकृपामुळे कांदा पिक पुर्णपणे सडलेले आहे.तरि सदर कांदा पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकर्‍याने मागणी केलेली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!