वाडे येथील श्री.नंदराज पाटील यांची मुंबई क्राईम बॅंचमध्ये पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व सध्या मुंबई येथील खार पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आदरणीय श्री. नंदराज दिनकरराव पाटील यांची मुंबई येथील क्राॅईम बॅंचला वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली असुन त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक पदि ११ वर्ष नोकरी केली आहे.
सुरुवातीला त्यांनी मुंबई खार पोलीस स्टेशनला नोकरी केली आहे. त्यानंतर धुळे, शिरपुर, नंदुरबार, तळोदा, नाशिक ग्रामिण अशी एकुण २९ वर्ष सेवा बजावली आहे. ते वाडे येथील माजी सरपंच व नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पतींगराव यांचे ते सुपुञ आहेत. या नियुक्तीबद्धल श्री. नंदराज पाटील यांचे वाडे गावातील सर्व संस्था, नागरीकातुन अभिनंदन होत आहे. तसेच पञकार अशोक बापु परदेशी व मिञ परीवार, माजी उपसरपंच सौ. ऊषाबाई अशोक परदेशी या परीवारामार्फतही आदरणीय श्री. नंदराज पाटील यांचे मनापासुन अभिनंदन केलेले आहे.