पिचर्डे येथे अवकाळी पावसाने काद्यांचे नुकसान.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे काल दि. १५ रोजी आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. यापूर्वी देखिल थोड़ा अवकाळी पाऊस आलेला होता.
पिचर्डे येथिल शेतकरी विश्वनाथ सुकदेव पाटील यांनी अडीच एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केलेली होती. कांदा पिक काढणीला आलेले असल्यामुळे काही कांदा काढलेला होता आणि काही जमिनीत होता. अवकाळी पाऊस जोरात आल्यामुळे कांदा पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकासाठी एक लाखाच्या वर खर्च झालेला आहे. कांदा रोप, लावणी, निंदणी, पावडर मारणे अशी मशागत धरून लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकावला गेला. खर्च केलेला पैसा देखिल निघणार नाही. निसर्गाची अशी अवकृपामुळे कांदा पिक पुर्णपणे सडलेले आहे.तरि सदर कांदा पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकर्याने मागणी केलेली आहे.