भडगावमध्ये शिवसेनेची ताकद वाढली.माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.!!!

0 1,814

भडगावमध्ये शिवसेनेची ताकद वाढली.माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरात आज शिवसेनेचा झेंडा अधिक बळकट झाला. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विजयकुमार नानासाहेब देशमुख यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते भडगाव येथील शिवसेना कार्यालयात संपन्न झाला.

या प्रसंगी आमदार पाटील म्हणाले, “शिवसेना ही केवळ पक्ष नसून जनतेची चळवळ आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी जनतेच्या हक्कांसाठी लढा द्यायचा आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “भडगावसारख्या तालुक्यांतील प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यकर्ते पक्षात येत असल्याने शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल. आगामी निवडणुकांमध्ये भडगाव तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला युवा सेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, मा नागराध्यक्ष गणेश परदेशी, इमरान अली सैय्यद, आदी पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच विविध विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या प्रवेशानंतर विजयकुमार देशमुख म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून लोकसेवा केली आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा पक्ष म्हणून मला शिवसेना योग्य वाटली. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगावच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार करतो.”कार्यक्रमाच्या शेवटी नवीन कार्यकर्त्यांना ‘शिवबंधन’ बांधून पक्षप्रवेश देण्यात आला. जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!