भडगाव तालुक्यात सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील — निस्वार्थ सेवाभावी कार्यामुळे जनतेच्या मनात विशेष स्थान.!!!
भडगाव तालुक्यात सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील — निस्वार्थ सेवाभावी कार्यामुळे जनतेच्या मनात विशेष स्थान.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवा आणि जनतेशी सतत संपर्क ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील यांचे नाव भडगाव तालुक्यात आदराने घेतले जाते.
निराधार, गरजवंत आणि वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करण्याची त्यांची वृत्ती खरोखर प्रेरणादायी ठरली आहे.
सौ. योजनाताई पाटील हॆ भडगाव नगरपरिषदेच्या मा.नगरसेविका होते शेतकरी संघ, भडगाव या संस्थेच्या संचालिका म्हणून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवतात. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्य केलेत आणि अनेक कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठीही योजनाताईंची भूमिका उल्लेखनीय आहे. त्या महिला दक्षता समिती, पोलीस स्टेशन भडगाव यांच्या अध्यक्षा असून, महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि सामाजिक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्या नेहमीच पुढे असतात.
त्याचबरोबर पिपल्स बँक, भडगाव येथे त्या व्हा. चेअरमन म्हणून कार्यरत असून, ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच “जनतेचा विश्वास,जनतेसाठी प्रयत्न” हा मूलमंत्र दिसून येतो.सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी राबवलेली अनेक उपक्रम योजना आज भडगावच्या नागरिकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.
सतत जनतेच्या संपर्कात राहून प्रत्येक समस्येचा तोडगा शोधण्याचा आणि सर्वांना समान न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो. त्यामुळेच आज सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील या नावाने भडगावच्या जनतेच्या मनात विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.