जळगावविशेष

भडगाव महसूल पथकाने जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरवर अद्याप पर्यंत कारवाई का नाही.? 

भडगाव महसूल पथकाने जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरवर अद्याप पर्यंत कारवाई का नाही.? 

कारवाई न होण्यासाठी तहसीलदारांवर कुणाचा दबाव.? 

भडगाव तहसीलच्या प्रांगणात बनवला चर्चेचा विषय.

भडगाव  प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील कराब शिवारात गिरणा नदी पात्रातून दि.१६/५/२०२५ रोजी मध्यरात्री भडगाव महसूलच्या एका पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करत ते ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय यांच्या ताब्यात दिले. यावेळी पथकातील तलाठ्यांनी रिपोर्ट बनवला सदर सापडलेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचा जबाब घेतला व पंचनामा केला परंतु पंचनाम्यात नावात बदल करून ते नाव फोडण्यात आले आहे. तसेच सात दिवस उलटले तरी त्यावर उदंडात्मक कारवाईची नोटीस निघालेली नाही का निघाली नाही अशी खमंग चर्चा भडगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात चर्चिले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर,डंपर, जेसीबी,हे जर महसूलच्या पथकाने पकडले तर त्याला काही कालावधीनंतर दंडात्मक नोटीस बजावली जाते परंतु या प्रकरणात सात दिवस उलटले तरी नोटीस का बजावली नाही ?

तसेच तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुणाचा दबाव आला का ? दंडात्मक कारवाईची नोटीस न निघाल्यास असा प्रकार पुन्हा पुन्हा घडू शकतो व तो इतरांवर अन्याय होऊ शकतो असे तहसील कार्यालयाच्या आवारात खुल्या चर्चेचा विषय बनला आहे. तरी महसूल विभागाने त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करून नाशिक विभागात अव्वल आलेल्या भडगाव चे नाव नावलौकिकच राहू द्यावे असे सुज्ञांकडून बोलले जात आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!