भडगावात ‘तिरंगा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद.!!!

0 798

भडगावात ‘तिरंगा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

पहलगाम येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल भारतीय जवांनाच्या सन्मानार्थ भडगाव शहरात आज सकाळी नऊ वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरीकांनी मोठ्याप्रणात सहभाग नोंदवला.

 

तिरंगा यात्रेची सुरुवात बाजारचौक-नगरपरिषद- मेन रोड मार्गे- मारोती मंदिर- शहिद जवान स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वळसा घेत तहसिल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यात्रेदरम्यान मेन रोडवरील शहिद जवान स्मारक येथे माजी सैनिकांच्या वतीने पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपा जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे युवा नेते सुमित किशोरआप्पा पाटील,’उबाठा’ शिवसेनेच्या नेत्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी,ज्येष्ठ मार्गदर्शन विनय जकातदार, माजी सैनिक किशोर पाटील यांनी प्रमुख मनोगत व्यक्त केले. श्रद्धांजलीपर मनोगत सामाजिक कार्यकर्ते इमरान अली सय्यद यांनी तर शांतीमंत्र प्रा.डी. डी. पाटील यांनी म्हटला. तिरंगा यात्रेचे प्रास्ताविक अॅड. अमोल नाना पाटील यांनी तर सूत्रसंचलन अॅड. निलेश तिवारी यांनी केले.

ऑपरेशन सिंदूर मधे शहीद झालेले जवान व पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रगीताने यात्रेचा समारोप करण्यात आला. या यात्रे दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम,देश सेना के साथ है अशा घोषणांनी यात्रामार्ग दणाणून निघाला होता.

यावेळी भडगाव तालुक्यातील सर्वं आजी-माजी सैनिक, भाजपा,शिवसेना,शिवसेना(उबाठा ), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अप),राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शप), भारतीय कॉग्रेस पक्षाचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वि.हि.प.बजरंग दल,अल्पसंख्याक आघाडी, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, शिक्षक संघटना,प्राध्यापक संघटना, कृषी केंद्र असोशिएशन, पत्रकार संघ,केमिस्ट असोशिएशन, भडगाव व्यापारी संघ,केशवसुत ज्ञानप्रबोधिनी, जागृती मित्र मंडळ,ध्यास फाउंडेशन, चालक- मालक संघटना, राष्ट्रीय राष्ट्रीय चर्मकार महासंघ, ज्येष्ठ नागरिक, महिला,पुरुष, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी भडगाव नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाचा मिनी बंब व कर्मचारी यांची उपस्थिती होती. भडगाव पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी स्वतः उपस्थित राहूण चोख बंदोबस्त बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!