मा. नगरसेवक इसाक मलिक व भिकनूर पठाण यांचा भाजपात जाहीर प्रवेश.!!!

0 1,349

मा. नगरसेवक इसाक मलिक व भिकनूर पठाण यांचा भाजपात जाहीर प्रवेश.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत असून, पक्षाच्या विकासवादी कार्यपद्धती व नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भडगाव नगरपरिषदेतील माजी नगरसेवक इसाक मलिक आणि भिकनूरखाँ पठाण यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, निर्मल सिडस संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, मा. जि. प. सदस्य मधू बापू काटे, जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, शेतकरी संघ संचालिका, मा नगरसेविका योजना ताई पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश घेताना नगरसेवक इसाक मलिक आणि भिकनूर पठाण यांनी सांगितले की, “आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या या नेतृत्वाचा भाग होण्यासाठी आम्ही भाजपमध्ये आलो आहोत. आमचे पुढील काम म्हणजे पक्षाचा झेंडा प्रत्येक घरापर्यंत नेणे.”

या कार्यक्रमात महेक कलेक्शनचे संचालक मोहसिनभाई शेख आणि सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई शेख यांचाही पक्षात प्रवेश झाला. या सर्वांच्या प्रवेशामुळे भडगाव शहरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

या प्रसंगी पक्षात दाखल झालेल्या सर्व नवीन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधू बापू काटे यांनी मानले.

या प्रवेशामुळे भडगाव तालुक्यात भाजपच्या स्थानिक संघटनेला नवे बळ मिळणार असून, येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याचा प्रभाव दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!