अण्णा विसपुते यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्ष (व्यापारी विभाग) म्हणून नियुक्ती.!!!
अण्णा विसपुते यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्ष (व्यापारी विभाग) म्हणून नियुक्ती.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी :-
भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या व्यापारी विभागात जळगाव जिल्हा अध्यक्षपदी अण्णा विसपुते (चाळीसगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांनी नियुक्तीपत्र देत दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पासून पुढील आदेशापर्यंत ही जबाबदारी सोपवली असल्याचे कळविले.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, विसपुते यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून समाजहितासाठी कार्य करावे. व्यापारी वर्गाच्या अडचणी, भ्रष्टाचारविरोधी मोहिमा, तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून देणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अण्णा विसपुते हे चाळीसगाव परिसरात सामाजिक कार्य, व्यापारी संघटनांमधील सहभाग आणि प्रामाणिक कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीबद्दल स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग आणि सामाजिक संस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरुद्ध अधिक प्रभावी चळवळ उभी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांनी म्हटले की, “समाजातील अन्याय, शोषण आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे. विसपुते यांच्या नेतृत्वामुळे जळगाव जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल.”